अनियंत्रित बसचा टळला अपघात रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली एसटी

KHOZ MASTER
1 Min Read

ईसोली:-विशेष प्रतिनिधी 

अमडापूर ते मेहकर जाणाऱ्या एसटी बसचा होणारा मोठा अपघात थोडक्यात टळला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रीत झालेली बस रस्त्याच्या कडेला झाडाला हलक्याने धडकून थांबल्याने प्रवासी बचावले. १ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.मेहकर आगाराची एमएच-०३-९२३३ क्रमांकाची बस अमडापूर येथे मुक्कामाला होती. अमडापूर येथून इसोली, जानेफळमार्गे मेहकरकडे जात असताना इसोलीपासून दोन किलोमीटर अंतरावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. सावंत यांच्या शेताजवळ उभ्या असलेल्या झाडावर जावून बस हलक्याने आदळली. बसमधून वीस प्रवासी प्रवास करीत होते. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. खिळखिळ्या अवस्थेतील बसमधून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. ही घटनादेखील अशा भंगार बसमुळेच घडल्याबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *