मलकापूर:- तालुका प्रतिनिधी
स्थानिक एमएसएम इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतेच विद्यार्थ्यांकरिता जुन्या काळातील विविध नाणी व विविध कलाकृतीचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते.या प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य डॉ. स्वरूप दत्ता व नव्याने रुजू झालेले प्राचार्य प्रवीणकुमार दुबे यांनी केले. प्रदर्शनास प्रमुख उपस्थिती पिंपळगाव राजा येथील शिक्षक – व संग्रहक शेखर खोमणे हे होते. प्रारंभी डॉ. स्वरूप दत्ता यांनी या प्रदर्शनीचे महत्त्व अधोरेखित करत यातून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा वृत्तीला चालना मिळेल, असे विश्वासाने सांगितले. या प्रदर्शनात सुमारे ५०० भारतीय व विदेशी नाणे, ३०० भारतीय व विदेशी नोटा, – वेगवेगळे पोस्टल स्टॅम्प, रेल्वेची जुनी तिकिटे, विविध प्रकारचे दगड, इंग्रजी शब्दकोश, महाराष्ट्रातील स्थानिक पक्षी यासह विविध कलाकृतीची सुरेख मांडणी केली होती. वर्ग ६ ते १० पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रदर्शनातील ऐतिहासिक वास्तूंचे निरीक्षण करून देश विदेशातील चलन, शिवकालीन नाणी, चांदीची नाणी प्रथमच अनुभवली व त्यातून त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळाली. या प्रदर्शनीसाठी शाळा समिती अध्यक्ष डॉ. पी.जी. मोहता, गौरीशंकर सेवा समितीचे अध्यक्ष मोरेश महाजन, कार्यकारी अध्यक्ष डॉ. अरविंद कोलते, उपाध्यक्ष गोविंद बाहेती, रमेश उमाळकर तथा सर्व संचालकांनी प्राचार्य व शिक्षक वृंदांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक शक्तीसिंह ठाकूर, सोनिया शर्मा, मंगला महाजन यांचे सहकार्य लाभले.
Users Today : 7