पालकमंत्र्यांच्या हस्ते गजेंद्र मापारी यांचा सत्कार

Khozmaster
1 Min Read

लोणार:- तालुका प्रतिनिधी 

सन २०२४-२५ या वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणून जिल्ह्यात महा ऑनलाईन पोर्टलद्वारे दिल्याजाणाऱ्या ऑनलाइन सेवा बाबत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सेतू मालक गजेंद्र भीमराव मापारी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.गजेंद्र मापारी मागील पंचवीस वर्षापासून सेतू व ई-सेवा महा  केंद्र चालवतात. तालुक्यातील विद्यार्थी, वयोवृद्ध, शेतकरी, महिला, गोरगरिबांना विविध प्रकारचे दाखले ई-सेवा महा केंद्रामार्फत काढावी लागतात. तालुक्यात चांगली सेवा देत असल्याबद्दल मापारी यांच्या सेवा केंद्राचा नावलौकिक आहे. यावर्षी २०२४-२५ मध्ये या ई-सेवा महा केंद्रांतर्गत जिल्ह्यातून सर्वात जास्त प्रमाणपत्र दाखले ऑनलाइन देण्याचे काम मापारी यांच्या ई सेवा महा केंद्राने केले. त्यामध्ये उत्पन्नाचे दाखले, शपथ पत्र, जातीचे दाखले, नॉन क्रिमिनल,वय रहिवासी दाखले अशाप्रकारे अनेक दाखले देण्याची काम त्यांच्या ई-सेवा केंद्राने केले. त्याची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते १ मे रोजी गजेंद्र मापारी यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

0 9 5 5 0 5
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *