वरुड येथील युवक ज्ञानेश्वर निकाळजे चिखलीतून बेपत्ता

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली:- तालुका प्रतिनिधी 

वरुड येथील ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे (वय २४) हा युवक चिखली येथे काम आला असता तो खामंगाव चौफुली वरुन बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी चिखली पोलीस स्टेशनला दिली आहे.चिखली येथे पुण्यावरून काही मित्र भेटायला आले असल्याचे आपल्या बहिणीला सांगून निघालेला ज्ञानेश्वर अद्यापही घरी पोहचला नाही. त्यामुळे चिंतेत असणाऱ्या या परिवाराने तशी तक्रार पोलीस स्टेशनला दिली आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी घरातून मोटरसायकलवरून निघून गेला, अद्यापही घरी पोहचला नाही. ज्ञानेश्वरने चिखली येथे आल्यावर शिवसाई नागरी सहकारी बँकेसमोर त्याची मोटरसायकल उभी केली होती. त्यानंतर मित्राला भेटण्याचे सांगून दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी तो बँकेतून बाहेर पडला. तेव्हापासून त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही. कुटुंबीयांनी त्याच्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिसरात शोधाशोध केली, मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही. ज्ञानेश्वरचे वडील सुखदेव निकाळजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचा मोबाईल क्रमांकही बंद आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती घेत तपास सुरू केला आहे. ज्ञानेश्वरबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने चिखली पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *