शेगाव:- तालुका प्रतिनिधी
शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घरफोडीच्या अट्टल गुन्हेगाराला अटक करुन मुद्देमाल हस्तगत केल्याची कारवाई २ मे २०२५ रोजी केली.
पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे २८ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी कमलसींग किरतसींग परीहार रा. विद्यानगर कलामाई शाळेजवळ, शेगाव यांनी पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली की, आरोपी शेख अहेमद शेख समद (वय ३६) वर्ष, रा. आरास ले आऊट, बुलढाणा व त्याचे सोबतचे एका इसमाने फिर्यादीचे खालचे घराचे समोरील दाराचे कुलूप तोडून तसेच शेजारी राहणारे देवलाल महादेव ढगे यांचे घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी व त्याचा सोबती कार मधून पळून जात असताना त्यांचे गाडी रस्त्याचे बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला धडकली. त्यामधील दोन्ही इसम पळून जात असताना एका इसमाला पकडले. परंतु, दुसरा इसम पळून गेला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन शेगांव शहर येथे कलम ३०५,३३१ (३), ६२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात अटक आरोपी शेख अहेमद शेख व त्याचा साथीदार सैय्यद शकील सैय्यद युसुफ रा. ईकबाल चौक बुलढाणा (फरार) याचेसोबत पो.स्टे. शेगाव शहद हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांकडुन एक कार, कारचे डिक्कीमध्ये असलेल्या दोन नंबर प्लेट, घरफोडीचे अवजार जसे बारीक टोक असलेले दोन लोखंडी रॉड, दोन तुटलेली कुलुपे, नगदी रुपये १५ हजार रूपये व गुन्ह्यातील मुद्देमाल असा जप्त करुन आरोपीस ताब्यात घेऊन त्यास विचारपुस करुन तपासामध्ये वर नमुद गुन्ह्यांमध्ये त्याचे साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली व त्यानंतर गुन्ह्यातील ईतर मुद्देमाल हस्तगत करुन एकूण ९, ८६, २५० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन पुराव्याकामी जप्त करण्यात करण्यात आला. सदरआरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याचेकडुन आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Users Today : 8