लोणार:- तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्रदिनी मी लोणारकर टीमने धारातीर्थ मंदिर ते यज्ञेश्वर मंदिराकडील रस्त्यातील पडलेल्या प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक बॅग, चिप्स रॅपर स्वच्छ केले.
टीमचे विलास जाधव, सचिन कापुरे, कमलेश आगरकर, संतोष जाधव, संतोष पुंड, विनय कुलकर्णी, गणेश उंबरकर, निखिलेश बहाड यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. स्वच्छतेची सेवा ‘मी लोणारकर टीम’ गेल्या दशकापासून करत आहे. यानंतर तहसील कार्यालय लोणार येथे ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी सचिन कापुरे यांनी वृक्षारोपण व सरोवर संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. मी लोणारकर टीमच्या वतीने या वर्षी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करू, अशी शपथ घेतली.
Users Today : 8