वर्दडी बुद्रूक:-विशेष प्रतिनिधी
येथील मुळ रहिवासी असलेले गावचे सुपुत्र सर्जेराव किसन वाघमारे हे भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सलग बावीस वर्षे सैन्यदलात देशसेवा करत घरादाराची, परिवाराची पर्वा न करता भारत मातेच्या रक्षानासाठी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल मायभूमीत मित्रपरिवाराने शाल, पुष्पहार घालून तसेच पेढे व जिलेबी वाटप करून सर्जेराव वाघमारे यांचा यथोचित सन्मान करत आनंद व्यक्त केला. यावेळी उपसरपंच रविंद्र नागरे, ग्राम पंचायत सदस्य पंडीत काकडे, उद्योजक राजू काकडे, गजानन काकडे, नारायण शिंदे, नंदलाल आटोळे, रविंद्र माने, विठ्ठल सोनकांबळे, बंडू काकडे, एकनाथ म्हस्के, कचरू रंधवे, शिवाजी काकडे, भागवत काकडे, उमाकांत काकडे, रामप्रसाद काकडे, तुषार बावणे आदी उपस्थित होते.
Users Today : 8