२०० वर्षांची परंपरा असलेला आई जगदंबा देवी स्वारीचा लोकोत्सव

KHOZ MASTER
2 Min Read

मासरुळ:-विशेष प्रतिनिधी 

बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथे दोनशे वर्षाची परंपरा असलेला अक्षय तृतीयेला पारंपारिक आई जगदंबा देवी स्वारी उत्सव ३० एप्रिल २०२५ रोजी पारंपरिक पद्धतीने पार पडला.मासरूळ येथील मुख्य चौकातील आई जगदंबा देवीचे मंदिर असून, ही देवी पूर्वमुखी आहे. नवसाला पावणारी ही देवी एका रात्रीतून प्रकटल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील स्वारी उत्सवास साजरी करण्यासाठी लेकीबाळींसह राज्याच्या कानाकोप-यातून भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात. यात मराठवाडा, खान्देश, विदर्भातूनही स्वारी उत्सवाला येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. सुवासिनी नारळाने, सव्वाशेर गुळ, चांदीचे डोळे, समई, पाळण्याने देवीची ओटी भरतात. ३० एप्रिल २०२५ रोजी सुरू होणाऱ्या स्वारी उत्सवाची सांगता पहाटे पहाटे ५ वाजता झाली. देवीच्या स्वारीची वंश परंपरा ही कैलासवासी जगन्नाथ आप्पा कोठाळे यांच्या कुटुंबाची असून अमित अनिल कोठाळे हे देवीची स्वारी घेतात. ग्रामस्थांची माध्यमातून गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करून कार्यक्रम आयोजित केला जातो. बैठकीत स्वारीनिमित्त निघणारी विविध देवीदेवतांचे सोंग कोणी घ्यायचे, हे ठरविण्यात येते.या स्वारीतील मुख्य आकर्षण असते ते नवनाथ महाराज यांचे अंगावर शहारे आणणारे भाल्याने हे सोंग रात्री दोन ते तीन वाजता दरम्यान होते. देवी उत्सवानिमित्त दोन दिवसात गावात भक्तीमय वातावरण असून, गावाला यात्रेचे स्वरुप आले होते. स्वारीच्या दिवशी महिला घरासमोर सडा, रांगोळी काढतात. गेल्या अनेक वर्षांपासून देवीची स्वारी अमित अनिल कोठाळे हे घेत आहेत. ही सवारी मोठ्या जिकिरीचे असून असते. यापूर्वी हा स्वारी उत्सव आठवडाभर चालत असते. या उत्सवासाठी गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव व धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार चेचरे, केंद्रे, सोनुने, माळी, बराटे, मिसाळकर तसेच गावातील कार्यरत सैनिक व माजी सैनिक व तरुणांनी सहकार्य केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *