मेहकर :- तालुका प्रतिनिधी
मेहकर येथील नगरपालिकेच्या अभिलेख विभागाला ३ मेच्या पहाटे पाच वाजता आग लागल्याने संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झाले. महत्त्वपूर्ण दस्त जळाल्याने मेहकरात एकच खळबळ उडाली असून, आगीमुळे संशयाचा धूर निर्माण झाला आहे. तीन वर्षांपूर्वी ३१ मार्च २०२२ रोजी मेहकर नगर पालिकेच्या शेजारीच जुन्या तहसीलला आग लागली होती. त्यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय व निवडणूक विभागाची कागदपत्रे जळाली होती. आज त्या घटनेची आठवण झाली.
आजची आग आणि त्यावेळी लागलेली आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या आगीबाबत नागरिकांमधून शंकाही व्यक्त केली जात आहे. मेहकर नगरपालिकेने सध्या मागील काही महिन्यात जोरदार विकास सुरू केला होता. त्याचप्रमाणे गावातील अतिक्रमणसुद्धा काढले जात होते. त्यामुळे मेहकरमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात होणार, यात शंका नाही, तर नगरपालिकेत सुद्धा अग्नीशामक वाहन दुरुस्तीला; सीसी कॅमेरेही बंद आग विझविण्यासाठी मेहकर, लोणार व चिखली येथील अग्नीशामक दलास बोलाविण्यात आले. परंतु मेहकरची अग्नीशामक वाहन नादुरुस्त असल्याने २ मे रोजी दुरुस्तीला पाठविण्यात आले होते. मागील दीड वर्षापासून नगर पालिकेचे नूतनीकरण सुरू आहे, त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. दुरुस्तीचे काम सुरू आहे. सर्व सुरळीत सुरू असताना ३ मे च्या पहाटे पाच वाजता अभिलेख विभागाला आग लागली. या घटनेत संपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. आग विझावण्यासाठी नगरपालिका कर्मचारी, अधिकारी, नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, नियंत्रण मिळविता आले नाही.नगरपालिकेचा सुरक्षा रक्षक रमेश अवसरमोल याला लेखा विभागातून धूर निघताना दिसला. मात्र त्याच्याजवळ मोबाइल नसल्याने त्याने महावितरण कार्यालयातील रखवालदाराला उठवून त्याच्या मोबाइलवरून पालिका कर्मचाऱ्यांशी संपर्क केला. अभिलेख विभागाला लागलेली आग आतल्या आत कमी प्रमाणात होती. दरवाजे व खिडक्या बंद असल्यामुळे ऑक्सिजन न मिळाल्याने आग वाढलेली नव्हती. मात्र दरवाजा ओढताच आगीचा भडका उडाला.फायर सिस्टिमही नाही,नूतनीकरणाचे काम जोरात सुरू आहे. पाच कोटीचे बजेट असलेल्या या कामात फायर सिस्टम उपलब्ध नाही. एकीकडे नगरपालिका कोणतीही इमारत बांधतांना फायर सेफ्टीच्या उपाययोजनांची पाहणी करते, परवानगी देते. मात्र, याच पालिकेत कोट्यवधींच्या कामात फावर सिस्टम नसल्यानेदेखील आश्चर्य व्यक्त होत आहे.
Users Today : 26