संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या आवाहनानुसार वक्फ संशोधन अधिनियम २०२५ विरुद्ध मुस्लिम समाजबांधवांनी बत्ती गुल आंदोलन केले. तालुक्यातील विविध गावांमधील दुकानदारांनी आपापल्या प्रतिष्ठानांचे लाइट बंद करून काळोख निर्माण केला. ३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता पंधरा मिनिटे हे आंदोलन करण्यात आले.
सोनाळा, पातुर्डा, टुणकी, बावनबीर, काकणवाडा, वरवट बकाल, आलेवाडी, चिचारी, सायखेड, संग्रामपूर, बोडखा, वानखेडसह ठिकठिकाणी दुकानदारांनी आपल्या दुकानांमधील तसेच घराघरांत वीजपुरवठा बंद केला. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे विदर्भ सचिव मौलवी महेमूद बेग यांच्या अध्यक्षतेखाली तर मौलवी सय्यद अफसर, मौलवी शेख अनिस, मौलवी शेख अफसर, मौलवी शेख ईरफान, मुफ्ती अ. रहेमान, मदरशा, जामा मशिदचे सचिव इरफानोद्दीन काझी यांच्या उपस्थितीत आंदोलनासंदर्भात बैठक घेण्यात आली.मौलवी महेमुद बेग, मौलवी शेख अनिस, शेख अफसर, इरफानोद्दीन काझी यांनी वक्फ संशोधन काळ्या कायद्याबाबत मार्गदर्शन केले.
