राष्ट्रीय सत्संग सोहळ्यात चांगल्या सुविधा मिळण्यासाठी नियोजन करा : आ. मनोज कायंदे

KHOZ MASTER
1 Min Read

सिंदखेड राजा:- तालुका प्रतिनिधी 

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे २० मे २०२५ रोजी अखिल भारतीय स्वामी समर्थ परिवाराचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे येत आहेत. राजमाता जिजाऊंच्या या ऐतिहासिक नगरीमध्ये हा कार्यक्रम होत असून येणाऱ्या सेवेकरी व भाविक भक्तांना चांगले सुविधा मिळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने रस्ते, लाईट, वाहनांसाठी पार्किंग याससह संबंधित विषय तत्काळ मार्गी लावावे, असे निर्देश आ. मनोज कायंदे यांनी दिले.राष्ट्रीय सत्संग मेळाव्याच्या कार्यक्रम संदर्भात नगरपरिषद सिंदखेड राजा येथे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना आ. कायदे म्हणाले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष द्यावे, स्वामी सेवेकरी यांनीही लक्ष घालून हा मेळावा यशस्वी करावा, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय खडसे यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आपले मत व्यक्त केले. प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, भाजप जिल्हाउपाध्यक्ष विष्णू मेहेत्रे, नगरपरिषद प्रशासक आशिष बोबडे, नगरपरिषद स्वच्छता पाणीपुरवठा अभियंता सतीश वाकडे, पोलीस स्टेशन ठाणेदार ब्रह्मदेव शेळके, पंचायत समिती गटविकास अधिकारी अंकुश मस्के, नायब तहसीलदार वराडे, महावितरणचे पडघान, वैद्यकीय अधीक्षक पुरातत्व विभाग यांच्यासह अन्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी तसेच स्वामी समर्थ सेवेकरी कैलास पालवे, प्रदीप घुगे, नीलेश देशमुख यांनी सुद्धा राष्ट्रीय सत्संग मेळावा कसा होणारे या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *