जळगाव जामोद:-विशेष प्रतिनिधी
जळगाव जामोद बस आगाराची महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर उत्पन्न देणारे आगार म्हणून ओळख आहे. परंतु, नवीन बसेस न मिळाल्याने आणि भंगार बसेसच्या संख्येत वाढ झाल्याने जळगाव जामोद आगारातील अनेक लांब पल्ल्याच्या बसेस बंद कराव्या लागल्या. मात्र, प्रवास्यांच्या सुविधेसाठी मतदारसंघाचे आ. डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नाने आगारात ५ नवीन बसगाड्या नुकत्याच दाखल झाल्या आहेत.आगारात आजमितीस जवळपास ४७ बसेस रस्त्यावर धावत असल्या तरी २० बसेस ह्या स्क्रॅपच्या मार्गावर आहेत. आगार व्यवस्थापक पवन टाले यांनी प्रशासनाकडे १० बसेसची मागणी केली होती. आ. डॉ संजय कुटे यांनी केलेल्या प्रयत्नाने अखेर जळगाव जामोद आगाराला ५ बसेस मिळाल्या असून त्यांचे विधिवत पूजन विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. १ मे २०२५ रोजी कामगार दिनानिमित्त माजी कामगार मंत्र्यांनी प्रवाशांना एक अनोखी भेट दिली आहे.यावेळी जळगाव जामोद मतदारसंघाचे आ. डॉ. संजय कुटे यांच्यासह माजी नगरसेवक नीलेश शर्मा, जळगाव आगार व्यवस्थापक पवन टाले, वाहतूक अधीक्षक नीलेश हाडोळे, वाहतूक निरीक्षक पियुष पाटकर, वाहतूक नियंत्रक सागर कोठे, आगार लिपिक रोशन दिक्कर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक चंदनकर मॅडम यांच्यासह शाहिर खान, रवी ढगे, चालक अयुब खान तसेच जळगाव जामोद आगारातील सर्व चालक, वाहक व कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.
