पोलीस अंमलदार राजू आडवेंचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव पालकमंत्र्यांनी कौतुकाने थोपटली पाठ

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी 

क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करून पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सायबर लॅबचे पोलीस अंमलदार राजू आडवे हे पोलीस महासंचालक पदकाचे मानकरी ठरले. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते आडवे यांचा पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राजू आडवे हे ७ मार्च २००५ साली पोलीस दलात भरती झाले होते. बुलढाणा पोलीस दलात सायबर लॅबमध्ये कार्यरत असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सेवा काळात लोणार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचा गुन्हा त्यांनी तांत्रिक तपास करून उघडकीस आणला. तसेच चाोरीचे चारशे क्विंटल सोयाबीन हस्तगत केल्यानंतर १२ गुन्हे उघडकीस आणण्यातही त्यांची कामगिरी मोलाची ठरली. जळगाव खान्देशमधील पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दतील २०१६ च्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात तांत्रिक साह्य केले. विविध ठिकाणचे एटीएम मशीन फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठीही मदत झाली. सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हेदेखील उघडकीस आणण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली.२३८ बक्षीसे, ४१ प्रशस्तीपत्रांनी बहुमान उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, बुलढाणा पोलीस अधीक्षक यांच्याकडून बक्षीसे व प्रशस्तीपत्र मिळाली आहेत. सेवाकाळात ४१ प्रशस्तीपत्रे व एकूण २३८ बक्षीसांचे ते मानकरी ठरले आहेत. दहा वर्षांचा गोपनीय सेवा अभिलेख उत्कृष्ट आहे.

0 9 5 5 0 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *