डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून सामाजिक समता सप्ताह

Khozmaster
3 Min Read

खामगांव:- तालुका प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या मार्फत दिनांक ०९/०४/२०२५ ते १४/०४/२०२५ या सप्ताहामध्ये महात्मा ज्योतीबा फुले यांची १९७वी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ व्या जयंती निमीत्ती सामाजिक समता सप्ताहर चे आयोजन करण्यात आले होते. त्या निमीत्त अकोल्यातील श्रीमती व्दारकाबाई रामराव कुटे बहुउद्देशिय संस्था, अकोला व प्रा. संतोष कुटे क्लासेस यांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण केंद्रावर दिनांक ०९/०४/२०२५ ते १४/०४/२०२५ या सप्ताहामध्ये सामाजिक समता सप्ताह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदशनपर कार्यक्रम ठेवण्यात आले होते. प्रशिक्षण केंद्र अकोला येथे दिनांक ०९/०४/२०२५ रोजी सकाळी दिपप्रज्वलन करुन संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले व आपल्याला डॉ. बाबासाहेबांनी दिलेले अधिकार व कर्तव्य यावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. संतोष कुटे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दिनांक १०/०४/२०२५ रोजी ₹१२ तास अभ्यासाची प्रेरणार हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सकाळी ७.०० ते रात्री ७.०० पर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याकरीता बसुन या उपक्रमास आपली उपस्थीती दर्शविली. यामध्ये संध्याकाळी विद्यार्थ्यांना अल्पहाराचे वाटप करण्यात आले. दिनांक ११/०४/२०२५ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९७ व्या जयंती निमीत्त त्यांच्या प्रतीमेस हार व पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळेस विद्यार्थ्यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब यांच्या जिवनातील कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना फळाचे वाटप करण्यात आले. दिनांक १२/०४/२०२५ रोजी संस्थेचे अध्यक्ष प्रा. संतोष कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. गणेश दि. वाघ (वक्ते) यांचे आजचा युवक व डॉ. बाबासाहेबश् या विषयावर व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोठया उत्साने भाग घेवुन प्रा. वाघ यांचे मार्गदर्शन मोठ्या आवडीने आत्मसाद केले. प्रा. वाघ यांचे मार्गदर्शन विद्याथ्यार्ना भविष्यात व स्पर्धा परिक्षेकरीता मोलाचे ठरेल. श्सामाजिक समता सप्ताहर च्या ५ व्या दिवशी मा. गिरीष सं. काळे (करियर व व्यक्तीमत्व विकास मार्गदर्शक) यांचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व व किरयर गायडन्स बाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या इटरयु करीता सामोरे जाताना आपली राहणीमान कश्याप्रकारे असायला पाहीजे याबाबत मार्गदशन केले. तसेच आपले शिक्षण यावरुन आपण कोणत्या प्रकारच्या शासकीय नोकऱ्या मिळवु शकतो याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले दिवशी दिनांक १४/०४/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमीत्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

0 9 5 5 0 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *