268 मोबाईल्स व 25 लाखांची वाहने मालकांना परत : नागपूर पोलिसांची मोठी कामगिरी: ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
नागपूर (अमित वानखडे): नागपूर शहरातील परिमंडळ क्रमांक ५ अंतर्गत पोलीस ठाण्यांनी हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. एकूण २६८ मोबाईल फोन, ज्याची एकूण किंमत ४९,५९,५१६ रुपये इतकी आहे, तसेच अंदाजे २५ लाख रुपयांची वाहने मूळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात आली.
पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर, पारडी, कपिलनगर, कोराडी, कळमना, नवीन कामठी, जुनी कामठी या पोलीस ठाण्यांनी तांत्रिक सहाय्याचा वापर करून ही मोबाईल शोध मोहिम यशस्वी केली.
तपशीलानुसार, कळमना पोलीस ठाण्याने सर्वाधिक ७७ मोबाईल (किंमत १२,०३,३०० रुपये) परत मिळवले, त्यानंतर कपिलनगर ठाण्याने ५० मोबाईल (६,१५,९५० रुपये), यशोधरानगरने २९ मोबाईल (३,४८,४०० रुपये), पारडीने २८ मोबाईल (५,८२,८०० रुपये), जुनी कामठीने २६ मोबाईल (३,३६,६०० रुपये), नवीन कामठीने २० मोबाईल (३,७५,००० रुपये), जरीपटका २६ मोबाईल (२,३४,८४४ रुपये) व कोराडी ठाण्याने १२ मोबाईल (१,६२,६२२ रुपये) परत मिळवले आहेत.
हा मुद्देमाल दिनांक ०३ एप्रिल २०२४ रोजी यशोधरानगर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात मूळ मालकांना सोपविण्यात आला. नागपूर पोलिसांच्या या प्रयत्नाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
नागपूर शहरातील परिमंडळ क्रमांक ०५ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांनी जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या कालावधीत एकूण ३ कोटी ८ लाख ३० हजार ९६६ रुपये किंमतीचा मुद्देमाल (मोबाईल, वाहने, सोने-चांदी) हस्तगत करून मूळ मालकांना परत केला आहे.
या कारवाईत कळमना, पारडी, नवीन कामठी, जुनी कामठी, यशोधरा नगर, कपिल नगर, जरीपटका आणि कोराडी या पोलीस ठाण्यांचा सहभाग होता. त्यापैकी कळमना पोलीस ठाण्याने २,६३,५३०० रुपये, पारडीने ५३,२००० रुपये, नवीन कामठीने ५५,४४००० रुपये, जुनी कामठीने ८४,०००० रुपये, यशोधरा नगरने २०,२१९९० रुपये, कपिल नगरने ६०,५५,५०० रुपये, जरीपटकाने ३०,९१९७६ रुपये, आणि कोराडीने ५५,५५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल परत केला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. डॉ. रविंद्र सिंघल, पोलीस आयुक्त नागपुर शहर यांच्या मार्गदर्शनात मा. श्री. निसार तांबोळी सह पोलीस आयुक्त, मा. श्री. प्रमोद कुमार शेवाळे, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग यांच्या देखरेखीखाली मा. श्री. निकेतन कदम, पोलीस उप आयुक्त परिमंडळ कंमांक ०५, नागपूर शहर यांच्या उपस्थितीत श्री. सत्यवीर बंडीवार सपोआ जरीपटका विभाग, श्री. विशाल क्षीरसागर, सहायक पोलीस आयुक्त कामठी विभाग व परीमंडळ क्रमांक ०५, नागपुर शहर मधील सर्व वपोनि यांच्या देखरेखी खाली तसेच परीमंडळ कंमांक ०५ मधील पोहवा संतोष वर्टी, पो.अं आषिश पिपरहेटे, पो. अं सचिन टांगले, पोलीस ठाण्यातील पो. अं धनराज उमरेडकर, रामचंद्र कौरती, एतेश्याम, पो. ना प्रमित गुप्ता, कांचन लता, दिनेश ठाकुर, रूपेश दुर्गे, कनोजिया, म.पो.अं लक्ष्मी रामटेके, पो.ना विजय गाते, म.पो.हवा गौरी हेडाऊ, पो.हवा सुर्यकांत चांभारे, पो. अं राहुल कनोजिया, सोपान सार्वे, रोशनी दहीकर, विनोद यादव, शुभांगी नागभिडे यांनी केली आहे.
नागपूर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत दिल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून नागपूर पोलिसांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Users Today : 9