नागपुर विमानतळावर 10 किलो गांजाची तस्करी उधळली; 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Khozmaster
2 Min Read

नागपुर विमानतळावर 10 किलो गांजाची तस्करी उधळली; 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथील कार्गो विभागात एका संशयास्पद पार्सलमधून तब्बल 10 किलो 28 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत अंदाजे 2 लाख 5 हजार 600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली सोनेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. प्राप्त माहितीनुसार, 3 मे रोजी रात्री 10.55 वाजता ते 4 मे रोजी पहाटे 3.15 दरम्यान कार्गो विभागात सुरक्षा प्रबंधक योगेंद्र सुधाकर बोरीकर यांनी एका खाकी रंगाच्या बॉक्सबद्दल संशय व्यक्त केला. बॉक्सवर “From Rahul fitness, Chapadia LG showroom road, Kantabanji, Orissa” ते “To Rahul fitness, Shahjahanpur, UP” असा पत्ता नमूद होता.

पार्सलची तपासणी केल्यावर त्यात “विमल पान मसाला” लिहिलेले बॅग दिसली, ज्यात हिरवट-काळसर रंगाची, उग्र वासाची, ओलसर अवस्थेतील फुले, पाने, बिया व काड्या असलेला गांजा सापडला. एन.डी.पी.एस. कायद्यान्वये (कलम 8 (क), 20 (ब), 2 (4)) गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल, सह पोलीस आयुक्त निस्सार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त लोहीत मतानी, सहायक पोलीस आयुक्त अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर, सपोनि अचल कपूर, पोउपनि संजय अवचिते, पोहया प्रदीप पिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. नागपूर पोलिसांनी नागरिकांना अशा तस्करीविरोधात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

0 8 9 4 7 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *