महाराष्ट्र दिनी प्रा. डॉ. सौ. संगीता टेकाडे यांचा सत्कार
नागपूर – महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था आणि राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “गर्जा महाराष्ट्र माझा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. डॉ. सौ. संगीता टेकाडे यांचा सत्कार स्वामी निर्मलानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच माजी आमदार विकास कुंभारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी राजेश कुंभलकर यांनी डॉ. टेकाडे यांची स्तुती करताना सांगितले की, त्यांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे ‘कलादान’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नकलांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे मोलाचे कार्य करत आहेत. त्यांनी विविध नाटकांतून हजारो भूमिका साकारल्या असून त्यांच्या अभिनय कौशल्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आज त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी आमदार दीनानाथ पडोळे, नगरसेविका हर्षला साबळे, मनोज साबळे, मिलिंद येवले, बंडू राऊत, जितेंद्र गडेकर, राजेश नाईक, राजू दैवतकर, डॉ. विनोद जैस्वाल, संजय नारेकर, शिवशंकर माळोदे, भरत गुप्ता, समीर येवले, नंदकिशोर लेकुळवारे, कृष्णकुमार पडवंशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 33