मधुमेह, अपचन, भूक न लागणे, स्थूलपणा असे अनेक आजार लहानपणी बालकांना होत आहेत. त्याला कारणीभूत गल्ली बोळात असलेल्या किराणा दुकानातून मिळणारे फास्ट फूट, जंक फूड आदी पदार्थ आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे घरा-घरात आजार पसरवण्याचे काम या छोट्या छोट्या दुकानातून होत असल्याचे दिसून येते. लहान बालके जिद्द करतात, रडतात, त्यामुळे नाईलाजाने पालकांना असे आरोग्यासाठी घातक असलेले पदार्थ घेवून द्यावे लागत आहेत. सध्या प्रत्येक ठिकाणी लहान मोठे किराणा दुकान असून त्यात जास्तीत जास्त प्रमाणात कन्फेषणारी आयटम असतात. ज्यात गोळ्या, बिस्कीट, खेळण्याचे आयटम, कुठे लॉटरी सारखे पैशे जिंकण्याचे आमिष, उन्हाळ्यात पेप्सी, जेली अश्या अनेक गोष्टी किराणा दुकानातून मिळतात. मात्र, अनेक वस्तू आरोग्यासाठी घातक असतात हे माहिती असून सुद्धा कित्येक पालकांना बाल हट्टापाई त्या वस्तू घेऊन द्याव्या लागतात. अन्न व औषध प्रशासनाने संबंधित पदार्थ कोठे तयार होतात, ते आरोग्यासाठी हानिकारक आहेत कां, त्यांनी ते पदार्थ बनवण्यासाठी रितसर परवानगी घेतलेली आहे कां, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सध्या किराणा दुकानातून काहीही विक्री होत आहे. अनेक दुकानात मेडिकल स्टोर मधून मिळणाऱ्या गोळ्या प्रमाणेच दिसणाऱ्या गोळ्या, इंजेक्शन प्रमाणेच असलेल्या इंजेक्शनमधून जेली विक्री केली जात आहे. अशा गोळ्या, जेलीचे लहान मुलांना आकर्षण असल्यामुळे या वस्तू घेण्यासाठी ते पालकांकडे जिद्द करीत आहेत. पालकही नाईलास्तव अशा वस्तू घेवून देत आहेत. मात्र, अशा मेडिकल वेस्टेज खरे गोळ्या, इजेक्शन घेतल्यास निरागस बालकांचे जीवन धोक्यात येवू शकते. याकडे संबंधित विभागने लक्ष देवून अशा वस्तू विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी होत आहे.
Users Today : 10