मृतकाच्या वारसास ६० लाखांचा धनादेश प्रदान कुलरचा शॉक लागल्याने झाला होता शिक्षक वाशिमकर यांचा मृत्यू

KHOZ MASTER
1 Min Read
मोताळा :- तालुका प्रतिनिधी

शहरातील वृंदावन नगर येथील शिक्षक वाशिमकर यांचा काही महिन्यापूर्वी कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कागदपत्रांची पूर्तता करुन मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाच्या वारसास ३० एप्रिल २०२५ रोजी स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक निरज कुमार यांच्या हस्ते ६० लाखाचा धनादेश वितरीत करण्यात आला.
वृंदावन नगर येथील राजेंद्र गणपत वाशिमकर हे तरोडा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक होते. २४ जून २०२४ रोजी कुलरमध्ये पाणी टाकतांना शॉक लागून त्यांचा दुदैवी मृत्यू झाला होता. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जनरल इन्शुरन्स कंपनीचा १ हजारात २० लाख रुपयांचा वैयक्तीक अपघाती विमा काढलेला होता. तर शासकीय सॅलरी अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने त्यांचा ४० लाख रुपयांचा विमा बैंकने काढलेला होता. राजेंद्र वाशिमकर यांचा शॉक लागून अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदांची पूर्तता ते कागदपत्रे बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. मोताळा स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक नितीन पाटील कागदपत्रे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले होते. ३० एप्रिल २०२५ रोजी शाखा व्यवस्थापक नितीन पाटील यांच्या उपस्थीतीत क्षेत्रिय प्रबंधक निरज कुमार यांच्या हस्ते मृतक शिक्षकाचे वारसाला ६० लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी रिजनल ऑफिसचे अधिकारी कृष्णा धरमकर, अंकित शर्मा यांची उपस्थिती होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *