गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीस अटक; १३,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

Khozmaster
2 Min Read

गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीस अटक; १३,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

कळमेश्वर (प्रतिनिधी) – कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत १३,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जीवन राजगुरू हे त्यांच्या पथकासह दिनांक ०३ एप्रिल २०२५ रोजी कळमेश्वर परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, गोन्ही शिवारातील उड्डाणपुलाखाली आनंद वर्मा व गोलू वर्मा हे आपल्या पानठेल्यातून गांजाची विक्री करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ सापळा रचून एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार पंचासमक्ष छापा टाकला. त्या वेळी आरोपी आनंद देवशंकर वर्मा (वय ३०, रा. वॉर्ड क्र. ०१, येरला) हा गांजाची विक्री करताना आढळून आला. मात्र दुसरा आरोपी गोलू वर्मा घटनास्थळावरून पोलीसांना पाहून पळून गेला.

पोलिसांनी घटनास्थळाची पंचासमक्ष झडती घेतली असता काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत ३९२ ग्रॅम ओलसर गांजा (किंमत ३,९२५ रुपये) व १०,००० रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण १३,९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपी आनंद वर्मा याच्याविरुद्ध कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८ (ब), २० (ब) (ii)(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी गोलू वर्मा याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. हर्ष पोद्दार, प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री. ओमप्रकाश कोकाटे, सपोनि जीवन राजगुरू, स.फौ. निलेश बर्वे, पोहवा रोहन डाखोरे, संजय बांते व प्रमोद तभाने यांनी केली.

0 8 9 4 7 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *