डंपरने चिरडल्याने किराणा व्यावसायिक ठार

Khozmaster
2 Min Read

खामगाव:- तालुका प्रतिनिधी 

तालुक्यातील खामगाव नगाव तरवाडी या ३८ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराकडून दोन्ही बाजूने रस्ता खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गातून ये-जा करणे अत्यंत कसरतीचे झालेले असून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दरम्यान या निर्माणाधीन रस्त्याच्या बांधकामाचा पहिला बळी गेला असून या ठिकाणी रस्ता बांधकामासाठी मुरूम वाहून नेणाऱ्या डंपरने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना ४ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान घडली. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील किराणा व्यवसायीक गोविंद रामचंद्र टावरी हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच २८ एयु ५३६५ ने खामगाव पिंपळगाव राजा कडे जात असताना खामगाव पिंपळगाव राजा रस्त्याचे निर्माण कार्य सुरू असून त्या ठिकाणी गौण खनिजाची वाहतूक करणारे डंपर क्रमांक एम. एच.४० सीडी ०८९१ ने त्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टावरी यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना चिरडले.या अपघातात गोविंद टावरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक गोविंद टावरी हे येथील सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या ओम किराणा दुकानाचे संचालक रामचंद्र टावरी यांचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर डंपर ताब्यात घेतले आहे. पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू होती. गेल्या काही दिवसापासून खामगाव तालुक्यातील खामगाव पिंपळगाव राजा मार्गावरील राहुड ते तांदुळवाडी या ३८ किमी चार रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम कासव गतीने सुरू असून संबंधित कंत्राटदाराने सदर मार्गावरील दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवलेला आहे. वास्तविक पाहता रस्ता बांधकामामध्ये पहिले एक बाजू पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराकडून बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर ठेवून बांधकाम केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.जडवाहतुकीसाठी कंत्राटदाराकडून रस्ता कुचकामी ठरत असून या रस्त्यावरून अनेकदा वाहनांचे अपघात होत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लक्ष देऊन तातडीने या मार्गाचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. असे वाहनधारकांकडून बोलल्या जात आहे.

0 9 5 5 0 9
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *