शेगावातील कुंटणखाण्यावर धाड: दोघांना अटक

Khozmaster
2 Min Read

शेगाव:- तालुका प्रतिनिधी 

मंदिर परिसरातील माऊली गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून देहविक्री करणाऱ्या महिलेसह दोन आंबट शौकिनाना ५ मे रोजी अटक केली आहे.याबाबत सपोनी गजानन सोनटक्के पोलीस स्टेशन शेगाव शहर यांनी फिर्याद दिली की, मंदिर परिसरातील माऊली गेस्ट हाऊसमध्ये आरोपी विजय महादेव पहुरकरवय५५ वर्ष रा. भूत बंगला परिसर शेगाव ता. याने त्याचे ताब्यातील माऊली गेस्ट हाऊस येथे महिलांचा अनैतिक देह व्यापाराचा कुंटनखाना चालवून त्या ठिकाणी ग्राहकांना व वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना बोलवित होता. वेश्याव्यवसाय करणाऱ्या पिडीत महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय
करून त्या मोबदल्यात ग्राहकांकडून पैसे स्वीकारत होता तसेच आरोपी शुद्धधन इंगळे रा. गोळेगाव तालुका जळगाव जामोद हात्या ठिकाणी ग्राहक म्हणून आलेला दिसला. अशा लेखी रिपोर्ट वरून पोलिसांनी आरोपीतांविरुद्ध अप. न. २४७/२०२५ कलम ३,४,५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वरील कार्यवाही पोनि नितीन पाटील सोबत एपीआय सोनटक्के, पोहे का राहुल पांडे, पोना अमोल जाधव, पोका जितेंद्र झाडोकार, आशिष भारती, किशोर साबेवम पोकाँ रंजनाताठर यांनी केली आहे.२० ते २५ प्रेमी जोडप्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई मागील आठवडाभरापासून शहर पोलीस अॅक्शन मोडवर आले असून
ठाणेदार नितिन पाटिल यांचे पथक अनेक गेस्ट हाऊसची झाडाझडती घेत छापेमारी करीत आहे. दोन दिवस अगोदर एसबीआय कॉलनी सुरू असलेल्या देह व्यापारावर छापा टाकून एका पिडीत युवतीची सुटका करीत व्यापार करून घेणाऱ्यावर कारवाई केली आहे. तर पुन्हा दुसऱ्याच दिवशी शहरातील एका गेस्ट हाऊस मध्ये सुरू असलेल्या देह व्यापरावर छापा टाकून दोन आंबट शौकीनांसह पीडित महिलेला ताब्यात घेतले आहे. तसेच लॉजवर थांबलेल्या बहेरगावच्या प्रेमयुगुलांना पकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.मागील आठवडाभरापासून हे मिशन सुरू आहे. आतापर्यंत २० ते २५ प्रेमी जोडप्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे

0 9 5 5 0 9
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *