पारंपारिक जपणारा देविदैत्याच्या सोंगाचा उत्सव

Khozmaster
2 Min Read

अमडापूर:-विशेष प्रतिनिधी 

येथे शेकडो वर्षांपूर्वीची देवी दैत्य सोंग परंपरा कायम राखत ३० एप्रिल साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयेच्या मंगळवार रोजी रात्रभर चालणारी नवमी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशी देवीदैत्याचे सोंग एकमेकांकडे तोंड करून साधारण दहा फुटाच्या अंतरावर नाचत नाचत गाव प्रदक्षिणा करीत देवीच्या दोन्ही हातात जंबिया त्याच्या टोकाला लिंबू अंबा भवानी की जय म्हणताच हलगीच्या तालावर देवी दैत्याच्या अंगावर चवताळून जाण्याची अदा खूप प्रभावी ठरले.
यावर्षीचे देवीचे सोंग खंडू राऊत तर दैत्याचे मनोज यवतकर यांनी घेतले. पूर्वी देवीचे पार्ट करणारे अंबू माळी उंच पुरे, धीपाड, गोरा गोल चेहरा देवीचे तेजस्वी रूप देवीची सोंग घेतेवेळी राहायचे व संपत दायजे दैत्याचे सोंग करत नवमीतील कलाकारांचा सराव महिनाभर भालेराव यांच्या वाड्यामध्ये चालायचा यामध्ये झाडूवाले पार्ट सुरुवातीला एक हजार फूट लांबच लांब रस्ता चार-पाच पुरुष लुगडे नेसून झाडायचे, लिंबोळ्या नावाचे सोंग मनोरंजनात्मक लिंबाच्या खूप लोंबत असणाऱ्या फांद्या कमरेला बांधून नाचत असे, कच्ची मच्छीचे पार्ट मच्छीच्या आकाराचा भला मोठा सांगाडा त्याच्यात पुरुष नाचत नाचत जायचा तदनंतर हुबेहूब लाल रंगाचे कपडे परिधान केलेले गणेशजी लाल मुकुट भलीमोठी लाल सोंड आगमन झाले की आसनावर स्थानापन्न करून सर्व कलाकार आरती करत नंतर सरस्वती, नृसिंह अवतार भक्त प्रल्हाद, राजा हिरण्यकश्यपू त्याच्या दोन राण्या आवडती नावडती हे सर्व पाठ झाल्यानंतर रामायणाला सुरुवात होऊन, राम लक्ष्मण सीता, रामाचा राज्याभिषेक, हनुमान माकडे, अयोध्या नगरी, दहातोंड्या रावण, सोन्याचे हरीण, रामाची लंका सीता हरण लढाई, हुबेहूब सादर करणारे कलावंत सुंदर कौशल्य दाखवायचे आज विविध मनोरंजनात्मक साधने उपलब्ध आहे तरीपण अजूनही जुनी परंपरा अमडापूर येथे जपलेली आहे.

0 9 5 5 0 9
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *