अट्टल गुन्हेगार अझहर खान ६ महिन्यासाठी तडीपार

KHOZ MASTER
1 Min Read

नांदुरा:- तालुका प्रतिनिधी 

विविध गुन्हे करून शहरात दहशत निर्माण करीत शहरातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणाऱ्या सराईत गुन्हेगार अझहर खान ऊर्फ बबलू यास उपविभागीय दंडाधिकारी संतोष शिंदे यांनी एका आदेशान्वये ६ महिन्या करिता नांदुरा, मलकापूर व मोताळा या तीन तालुक्यातुन हद्दपार (तडीपार) केले आहे.शहरातील आठवडी बाजार या भागात राहणाऱ्या अझहर खान उर्फ बबलु याचे विरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात मालमत्ते विरुद्ध, दुखापत, दंगा करणे दरोडा घालणे दहशत निर्माण करणे यासारखे गम्भीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते, आरोपीवर वारंवार प्रतिबंधक कार्यवाही करूनही त्याच्या वर्तुणूकमध्ये काही एक सुधारणा होत नव्हती म्हणून नांदुरा ठाणेदार विलास पाटील यांनी त्याचे विरोधात मलकापूर उपविभागीय महसूल अधिकारी संतोष शिंदे यांच्या कडे हद्दपार करण्या साठी प्रस्ताव पाठविला होता. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यावर संतोष शिंदे उप विभागीय दंडधिकारी मलकापूर यांनी एका आदेशान्वये त्याला नांदुरा, मलकापूर आणि मोताळा या तीन तालुक्यातुन सहा महिन्या करिता तडीपार करण्यात आलेले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *