नांदुरा:- तालुका प्रतिनिधी
नांदुरा तालुका खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित नांदुराच्या व्यवस्थापन समिती सदस्यांची निवडणूक दिनाक ३.५.२०२५ रोजी सपन्न झाली असून निकाल दिनाक ४ मे रोजी जाहीर करण्यात आले असता त्यात महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली. खविसच्या व्यवस्थापक समितीच्या १६ जागेकरीता झालेल्या निवडणुकीत ३२ उमेदवारानी आपले अर्ज कायम ठेवले होते. त्यात महायुतीचे शेतकरी विकास पॅनल व महाविकास आघाडीचे शेतकरी पॅनल यांच्यात सरळ लढत होऊन महाविकास आघाडीच्या पॅनलचे ६ उमेदवार तर महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे १० उमेदवार विजयी झाले आहे.सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अशा निवडणुकीत सहकारी संस्था प्रतिनिधी मतदार संघातून मविआचे जयप्रसाद विजयसिंग राजपूत (२३), संजय निवृती पाटील (१९), रामेश्वर देवराव पाटील (२१), विश्वासराव वामराव पाटील (१८) तर महायुती प्रणित शेतकरी विकास पॅनलचे प्रदीप एकनाथराव हेलगे (२१) मोहन भिकाजी पाटील (२०) बलदेवराव नामदेवराव चोपडे (१९) मते घेत विजयी झाले. वैयक्तिक अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून महायुतीचे प्रभाकर जगदेव इंगळे १०८८ मते घेत विजयी ठरले. तर महिला राखीव मतदार संघातून मविआच्या नीता भगवान धांडे ९२५ व महायुतीच्या सिंधुबाई रामराव ढोले ९८३ मते घेत विजयी ठरल्या. भटक्या विमुक्त जाती, जमाती मतदार संघातून मविआचे गजानन दामोदर खोंदले ९७४, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून महायुतीचे मुकुंद तुळशीराम मापारी ११३१ मते घेत विजयी ठरले. तर वैयक्तिक सर्वसाधारण मतदारसंघातून अनिल मधुकर शिंगोटे १०८५, गणेश रामराव ताठे १०३४, अनंता महादेव लांडे ९८०, श्रीकृष्ण बळीराम जुनारे ९४५ मते घेत या उमेद्वारांनी विजय प्राप्त केला. यावेळी आ. संचेती यांच्या नेतृत्वात विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सह. निबंधक ए. बी. सांगळे यांनी काम पाहिले.
Users Today : 11