घिर्णी येथील जि. प. बक्षीस वितरण समारंभ

Khozmaster
2 Min Read

घिर्णी:-विशेष प्रतिनिधी 

येथील गावचे रहिवासी तामिळनाडू राज्याचे सचिव सज्जनसिंह चव्हाण यांचेकडून महाराष्ट्रदिनी स्वर्गीय रामसिंह रावजी चव्हाण यांच्या स्मृती पित्यर्थ सर्व एनएमएमएस पात्र मुला मुलींना प्रत्येकी १००० रुपयांचे बक्षीस त्यांच्या आई पंचफुलाबाई चव्हाण यांच्याहस्ते देण्यात आले. एन. डी. इंगळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुळ घिर्णी निवासी यांच्याकडून तालुका व शाळा स्तरावरील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या मुला-मुलींना तीन हजार, दोन हजार रुपये व पंधराशे रुपये व एक हजार रुपये बक्षीस देण्यात आले. माजी सरपंच भगवान चोपडे यांच्याकडून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या मुला मुलींना एक हजार रुपये ५०० व ३०० रुपये बक्षीस देण्यात आले. वैभव वाघमारे शिक्षक मुळ रहिवासी घिर्णी यांच्याकडून स्वर्गीय सुखदेव जगदेव वाघमारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ३००० रू. बक्षीस देण्यात आले. शाळेतील विज्ञान शिक्षिका कु. भारती जानकीराम खुमकर यांच्याकडून एनएमएमएस पात्र सर्व मुला मुलींना परीक्षेसाठी पॅड बक्षीस देण्यात आले. तसेच खुमकर मॅडम यांनी होमी बाबा परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या मुला-मुलींना परीक्षेसाठी पॅड बक्षीस दिले. वर्ग पहिलीचा धनंजय धोरणला मॅडमनी ट्रॉफी व पॅड बक्षीस दिले. शाळेचे माजी शिक्षक गजानन डोसे यांच्याकडून एन.एम. एम. एस. पात्र मुला मुलींना एक हजार रुपये बक्षीस देण्यात आले. वर्गशिक्षक घाटे यांनी सर्व मुला मुलींना एक-एक मोठी डायरी बक्षीस दिली. वर्ग ८ वी च्या सर्व मुला मुलींनी वर्ग शिक्षक व सर्व शिक्षक शिक्षकांना भेट वस्तू दिल्या. कु. भारति खुमकर यांनी वर्ग शिक्षक सतिश घाटे सरांना बक्षीस दिले. शाळेमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा अनेक ट्रॉफी सन्मानपत्रे व प्रमाणपत्रे यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विष्णू गुलाबसिंह बघेले सरांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी शेळके व उतपूरे सरांनी केले. या कार्यक्रमाला गावच्या सरपंच प्रमिलाताई चोपडे उपसरपंच इंगळेताई सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्रसिंग चव्हाण, उपाध्यक्ष माधुरीताई बोपले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व सदस्या उपस्थित व ग्रामस्थ उपस्थित होते.

0 9 5 5 0 9
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *