छत्रपति शिवाजी विद्यार्थी संघा तर्फे श्री शिवाजी सायन्स कॉलेजला वॉटर कूलर भेट
नागपूर – छत्रपति शिवाजी विद्यार्थी संघा तर्फे उन्हाळ्याच्या कडाक्याला सामोरे जाणाऱ्या श्री शिवाजी सायन्स कॉलेज, काँग्रेस नगर येथील विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना थंड पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर कूलर भेट स्वरूपात देण्यात आला.
या उपक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख प्रमुख उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवून उचललेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमावेळी महाविद्यालय अध्यक्षा अभिलाषा महंत, कार्यकारी अध्यक्ष यशस्वी कोल्हे, तसेच सलोनी राऊत, अभय सिंग, नंदिनी वागळे, मीत खापेकर, अदिती गुरवे, जान्हवी कुडकेलवार, पलग बागडे, खुशी झा, नेहा अष्ठिकर, धनश्री चौहान आणि शहर अध्यक्ष रोहन दरोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना ठरला आहे.
Users Today : 33