पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्या : डॉ. राठोड

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर:- तालुका प्रतिनिधी 

तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, तरुण युवक, महिला, शेतकरी यांना स्वयं रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता शेळीपालन, डेअरी किंवा कुक्कुटपालन स्वयंरोजगार व्यवसाय सुरु करण्यांची संधी पशुसंवर्धन विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी २ मे ते १ जून पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेचा गरजुंनी लाभ घ्यावा, असे अहवान पशु संवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. संदेश राठोड व पशु वैद्यकीय अधिकारी रघुनाथ फोफसे यांनी केले आहे.पशु संवर्धन विभागाच्या वतीने विविध योजना व उपक्रम राबण्यात येत आहेत. नाविण्यपूर्ण योजना, राज्यस्तरीय योजना व जिल्हा स्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाय, म्हशीचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, १००० मासल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपणासाठी निवारा शेड करीता अर्थ साह्य देणे. १०० कुक्कुट पिलांचे वाटप, तलंग गट वाटप या योनेसाठी ऑनलाइन पध्दतीने निवड प्रक्रिया राबवली जाते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी पशु संवर्धन अधिकारी विस्तार डॉ. संदेश राठोड, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. तृप्ती पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमितकुमार दुबे, सहाय्यक आयुक्त डॉ. गजानन तोटेवाड, पशु वैद्यकीय केंद्राती पशुध विकास अधिकारी डॉ. चेतन शेंबेकर दसरखेड, आर. एच. फोपसे देवधाबा, एस. टी. गंडे धरणगाव, एस. बी. सोनवणे वडजी, एन. बी. झळके उमाळी व वरखेड, एम. बी. चोपडे वडोदा, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशु संवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *