नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई – एम.डी. पावडर प्रकरणात आरोपी अटकेत
नागपूर | ६ मे २०२५ : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज मोठी कारवाई करत एक आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून २५ ग्रॅम एम.डी. पावडर आणि मोबाईलसह सुमारे २.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ६ मे २०२५ रोजी दुपारी १ ते २.३० दरम्यान, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्याखाली पाहीजे असलेल्या आरोपी शेख शाहीद शेख कासीम याचा शोध घेत असताना, यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत संजयबाग कॉलनीजवळ तो एम.डी. पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी शेख शाहीद शेख कासीम (वय ३५, रा. राजीव गांधी नगर, यशोधरानगर) याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे झिप लॉक पिशवीत २५ ग्रॅम एम.डी. पावडर आढळून आली. त्याच्याकडून मोबाईल फोनसह २,०५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपीने अमरावती येथील त्याचा साथीदार राजीक शेख याच्याकडून ही अमली पदार्थ घेतल्याची कबुली दिली आहे. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एम.डी. पावडरची विक्री करत असल्याचे उघड झाले असून त्याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८ (क), २२ (ब), २९ अंतर्गत यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेतील आरोपीला पुढील तपासासाठी यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. रविंद्रकुमार सिंगल, सहआयुक्त श्री. निसार तांबोळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) श्री. राहुल माकणीकर, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोनि. गजानन गुल्हाने, सपोनि मनोज घुरडे, पोहवा विजय यादव, मनोज नेवारे, शैलेष डोबोले, पवन गजभिये, विवेक अडाऊ, नितीन साळुंखे, अनुप यादव, गणेश जोगेकर, रोहीत काळे आणि सुभाष गजभिये यांचा सक्रिय सहभाग होता.
Users Today : 1