मान्सूनपूर्व तयारीसाठी आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ! ३७ गावांमध्ये पावसाळ्यात जाणे जिकिरीचे; औषधसाठा आणि सर्वेक्षणाला गती !

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा:- जिल्हा प्रतिनिधी 

जिल्ह्यात मान्सूनपूर्व आरोग्य तयारीसाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारांचा प्रतिबंध आणि औषधसाठ्याची व्यवस्था यावर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात ३७गावांमध्ये पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा पोहोचवणे कठीण जाते, तर २८६ गावे पूरप्रवण असून, त्यात ८६ गावे अतिसंवेदनशील आहेत. या पार्श्वभूमीवर, साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक औषधसाठा स्थानिक आरोग्य केंद्रांपर्यंत त्वरित पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली. औषधसाठा राखीव, प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्राधान्य!जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे साथीच्या आजारांवरील औषधसाठा उपलब्ध आहे. आवश्यक असल्यास अतिरिक्त साठा तातडीने खरेदी केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साठा पोहोचवण्यात येत असून, राखीव औषधसाठाही तयार ठेवण्यात येत आहे. पूरजन्य परिस्थितीत ग्रामपंचायतींना फुटलेल्या नळजळवाहिन्या, जलस्रोत स्वच्छता आणि ब्लिचिंग याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा, मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे आणि जळगाव जामोदमधील आदिवासी भागातील आधीच्या साथींवरून धडा घेत यंत्रणा सतर्क आहे. मुख्यालयी उपस्थित राहून मान्सूनपूर्व मान्सूनपूर्व रोग सर्वेक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, लक्षणे आणि धोका यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश आहेत. जुन्या वाहनांचीही दुरुस्ती सुरू आहे.सर्वंकष आढावा घेणार – डॉ. गिते ज्या गावांमध्ये जाणे जिकरीचे ठरते अशा गावांचा सर्वकष आढावा घेऊन उपाययोजना केली जाईल. प्रसंगी अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी पायी पोहोचून सेवा देतील, असे डीएचओ डॉ. अमोल गिते म्हणाले. पावसाळ्यात या गावांत पोहोचणे कठीण पावसाळ्यात पोहोचणे कठीण ठरणाऱ्या गावांमध्ये पातुर्डा, पिंपळगाव काळे, देऊळगाव साकर्शा, सोनाळा यांचा समावेश आहे. या गावांमध्ये आधीच औषधसाठा पोहोचवण्याचे नियोजन सुरू असून, संभाव्य आजारांना आळा घालण्यासाठी सर्व विभाग सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

0 9 5 5 1 3
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *