तापमानामुळे आंबिया बहर ओसरला! शेतकऱ्यांची चिंता वाढली: मदतीची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव:- तालुका प्रतिनिधी 

संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी हजारो रुपयांचा खर्च करत कीटकनाशके व रासायनिक खतांचे नियोजन केले. मात्र, गेल्या काही आठवड्यापासून सतत वाढणाऱ्या तापमानामुळे या झाडांवर विपरीत परिणाम झाला असून, बहर आलेल्या झाडांवरील फळांची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे.
खामगावसह बुलढाणा जिल्ह्यातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी बागांची देखभाल आणि फळधारणेसाठी मेहनत घेतली होती. परंतु, मार्चअखेरीस सुक्रु झालेली आणि एप्रिलभर तीव्र झालेली उष्णता मे महिन्यातही कायम राहिल्याने झाडांवरील कोवळी फळे गळून पडत आहेत.परिणामी, संपूर्ण बहर वाया जात असल्याचे चित्र आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *