संग्रामपूर, सोनाळ्यात पोलिसांची ‘मॉक ड्रिल’ युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्गदर्शक सूचना

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी 

युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून ग्रामीण भागात प्रशासकीय यंत्रणेकडून मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. युद्धाच्या काळात नागरिकांनी आपत्कालीन स्थितीला कसं सामोरे जायचे. विशेषतः हवाई हल्ले आणि अन्य हल्ल्यापासून वाचण्याची तयारी कशी करायची याबाबत नागरिकांना सूचना करण्यात आल्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बुधवारी दुपारी महसूल, आरोग्य, अग्निशमन दलासह पोलिस प्रशासनाच्या वतीने संग्रामपूर शहरासह सोनाळा येथील बसस्थानकावर मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. मॉक ड्रिल दरम्यान हवाई हल्ला आणि ब्लॅकआउट झाल्यास नागरिकांनी काय करावे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांनी घरात वैद्यकीय किट, रेशन, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, सोशल मीडिया व इतरत्र कोणीही अफवा पसरवू नये. यावेळी संग्रामपूर तहसीलचे नायब तहसीलदार विकास शिंदे, तामगावचे ठाणेदार राजेंद्र पवार, सोनाळाचे ठाणेदार चंद्रकांत पाटील आदींसह इतर उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *