खामगाव:- तालुका प्रतिनिधी
पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलेल्या ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकांना बंधनकारक आहे. मात्र, अनेक ग्राहकांना याबद्दल माहितीच नसते. शौचालय, शुद्ध पाणी, इंधनाची गुणवत्ता तपासणी, प्रथमोपचार किट, हवा आणि आपत्कालीन कॉलसाठी आवश्यक सेवा या सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. तथापि, शहरातील बहुतेक पेट्रोल पंपांवर या सुविधांचा लाभग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र ‘लोकमत’ दि.७ मे रोजी केलेल्या पाहणीत आढळून आले. नगरपालिकेसमोरील पेट्रोल पंप या पेट्रोल पंपांमध्ये हवा भरण्याचे मशीन बंद अवस्थेत आढळले. त्या मशीन समोर कोण्या व्यक्तीची सायकल उभी होती. स्वच्छतागृहाची ही अवस्था बिकट दिसून आलीघाटपुरी नाका रोडवरील पंप या पंपामध्ये प्रथोमपचाराची सुविधा होती. त्यासोबत स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध होती. मात्र, हवा भरण्याची मशीन बंद अवस्थेत होती. त्यामुळे ग्राहकांना हवा भरण्यासाठी आर्थिक झळ सोसत इतरत्र जावे लागले. इतर पंपापेक्षा अधिक सुविधा याठिकाणी होत्या. याठिकाणी बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध होत्या. पोस्ट ऑफीससमोरील पंपामध्ये ना हवा भरण्याची मशीन दिसून आली, ना शौचालयाची सुविधा होती. वाहन उभे करण्यासाठीही व्यवस्थित जागा नव्हती. त्यामुळे ग्राहकांना या पंपामध्ये पेट्रोलशिवाय कुठल्याही सुविधा मिळत नाहीत.
Users Today : 15