मलकापूर येथे महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड वितरण

Khozmaster
3 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

महाराष्ट्र ग्रामीण न्युज व हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते, यावेळी ३५६ प्रस्तावापैकी निवड करून ६० मान्यवरांना महाराष्ट्र एक्सलन्स पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.. यावेळी सहा माहिती आयुक्त नीलेश तायडे होते तर प्रमुख पाहुणे अशांत वानखेडे, धनश्री काटीकर, प्रसाद जाधव, बाळासाहेब दामोदर, बंडू चवरे, फारुख शेख, दामोदर शर्मा, विरसिंहदादा राजपूत होते. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, वकील, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड २०२५ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महिलांसाठी मानाचे असे समजले जाणारे गृहरक्षक दलामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला होमगार्ड भगिनींचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाला पत्रकार अजय टप, सतीश दांडगे, नथ्थु हिवराळे, संदीप सावजी, प्रकाश थेट, राजेश इंगळे, विनायक तळेकर, समाधान सुरवाडे, स्वप्निल आकोटकर, धीरज वैष्णव, कैलास काळे, अनिल गोठी, मयूर लड्डा, नीलेश चोपडे, प्रमोद हिवराळे, अपरेश तुपकरी आदी उपस्थित होते. संचालन भारत सुरवाडे, तर आभार प्रदर्शन प्रदीप इंगळे यांनी केले पुरस्कार प्राप्त व्यक्ती किरण सूर्यवंशी कृषी, सुरेश उत्तपुरे शिक्षण, प्रशांत कन्हे कला, महादेव बावरे शिक्षण, रुपेश अवचार सामाजिक, निळकंठ पाटील सामाजिक, गजानन चेक सामाजिक, बालाजी कांबळे सामाजिक, पूर्णाजी खोडके सामाजिक, जनार्दन काळे सामाजिक, सुखनंदन हांडे सामाजिक, शिल्पा देशमुख राजकीय, सारंग माळेकर राजकीय, अनिल दाहेलकर पत्रकार, मोहम्मद फारुख अब्दुल गफार, तमेशस्वर पांढरे पत्रकार, भीमकिरण दामोदर पत्रकार, गोपाळ कळस्कर पत्रकार, संजय भरडूक पत्रकार, मिलिंद इंगळे पत्रकार, बाळू मुंगळे पत्रकार, अॅड. मोहन शुक्ला विधी, शाहीर भीमराव अंभोरे कला, डॉ. मनोहर शेगोकार वैद्यकीय, प्रेमदास वाकोडे वैद्यकीय, शारदा अंभोरे महिला व बालकल्याण, पूजा रडके उद्योजक, राजेश घुगे, अॅड. भारती कुमावत बाल लैंगिकता लेखिका, डॉ. नयन महाजन विधी प्राचार्य, शरद तेलंग आरोग्य विभाग, गजानन नाकाडे उद्योजक विभाग यांचा समावेश होता.

0 9 5 5 1 3
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *