आदर्श विद्यालयातर्फे पक्ष्यांसाठी जलपात्रे वितरण शिक्षण प्रसारक मंडळाचा पर्यावरणविषयक स्तुत्य उपक्रम

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

स्थानिक आदर्श विद्यालयातर्फे ६ मे २०२५ रोजी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा पर्यावरण संवर्धन करण्याच्या हेतूने पक्षांसाठी पानवठे (जलपात्र) तसेच घरटे वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे तर प्रमुख उपस्थितीमध्ये सचिव प्रेमराज भाला, कोषाध्यक्ष अॅड. विजयकुमार कोठारी, संचालक सहदेवराव सुरडकर, अमोल खेकाळे, जिल्हा संघचालक सुभाषराव मोरे, पवन लढ्ढा हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कुटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात कुटे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. अॅड.विजयकुमार कोठारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पक्षी संवर्धनासाठी संस्थेने हाती घेतलेला हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याविषयी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात रामकृष्ण शेटे यांनी जल, जमीन आणि जंगले वाचवण्यासाठी पक्षांची भूमिका विशद केली. यावेळी आदर्श विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले, उपप्राचार्य भगवान आरसोडे यांच्या मार्गदर्शनात कलाशिक्षक गणेश अंभोरे, गजानन काळे, मंगेश कापसे, विकास जाधव, योगेश कुलवंत, विनोद कुटे, विशाल कुरकुटे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी संस्थेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन विकास जाधव यांनी तर आभार प्रदर्शन गजानन काळे यांनी केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *