जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा उत्कृष्ट निकाल

Khozmaster
1 Min Read

पिंपळगाव सराई:-विशेष प्रतिनिधी 

फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जनता कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान शाखेचा निकाल उत्कृष्ठ लागला असून पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल आहेत. तर कला शाखेचा ८४ टक्के निकाल निकाल लागला आहे.विज्ञान शाखेमध्ये ५६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यात १८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणित तर ३७ विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक शीतल देविदास गवते (८५.१७ टक्के), द्वितीय समीक्षा नितेश लहाने (८२.३३ टक्के) तर तृतीय क्रमांक रोहन सांडू इंगळे (८२.१७ टक्के) यांनी प्राप्त केले. कला शाखेमध्ये २४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम क्रमांक प्रेरणा समाधान सिरसाट (७७.५०), द्वितीय क्रमांक संजीवनी रामेश्वर जुंबड (७० टक्के) तर तृतीय क्रमांक वर्षा साहेबराव सिरसाट (६७.८३) यांनी प्राप्त केले. दरम्यान, वर्ग बारावीच्या विज्ञान व कला शाखेत प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला व संपूर्ण संचालक, सल्लागार, प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

0 9 5 5 1 3
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *