बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता देऊळगांवराजा तालुक्यातील चिंचोली बुरुकुल, शिवणी अरमाळ व मेंडगाव या तीन गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिली.चिंचोली बुरुकुल येथे ४६३ पशुधन व १ हजार लोकसंख्येसाठी एक टँकरद्वारे २९ हजार ५७० लिटर्स पाणी पुरवठा, शिवणी अरमाळ येथे ७०० पशुधन व २ हजार ७०० लोकसंख्येसाठी एक टँकरद्वारे ६८ हजार ९०० लिटर्स पाणी पुरवठा, मेंडगाव येथे १ हजार २१ पशुधन व ३ हजार ५०० लोकसंख्येसाठी एक टँकरद्वारे ९४ हजार ५०० लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
Users Today : 15