अवकाळी पावसाचा मोताळा तालुक्याला फटका

KHOZ MASTER
1 Min Read

मोताळा:-तालुका प्रतिनिधी 

तालुक्यात ६ व ७ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ६ गावांना मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे केळी व भाजीपाला पिकांचे २१.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मंगळवार व बुधवारी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोताळा तालुक्यातील २१.५० हेक्टर क्षेत्रातील केळी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पिंपळगाव देवी, पांगरखेड (ऊजाड) दहिगाव, माळेगाव, कोल्ही गोलर, लपाली या गावाला मोठा फटका बसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. नुकसानीचा सर्व्हे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *