विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत भरणार वर्ग

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांमध्ये पायभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसीत करण्यासाठी जिल्ह्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविला जात आहे. या अभियानांतर्गत आता शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीत अध्ययनात मागे असणारे तसेच अपेक्षीत अध्ययन क्षमता साध्य न केलेल्या मुलांच्या ऑनलाइन किंवा ऑफर्लान संपर्कात राहून मार्गदर्शन करावे लागेल. ज्या विध्यार्थ्यांच्या अपेक्षित अंतिम अध्ययनस्तर प्राप्त झालेला नाही, त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी ५ व २० मे, १५ व ३० जूनला संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नूसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधन्य देण्यात आले आहे. या प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केलेल नाही. ज्या अनुषंगाने राज्यात निपूण भारत अभियाना अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान लागू झाले आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास प्राधान्य आहे त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी दुसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्या नियम सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याची लक्ष आहे.दुसरी पेक्षा वरच्या वगार्तील ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन सत्ता प्राप्त केली नाही, त्या विद्यार्थ्यांना क्षमता प्राप्त करण्याची संधी देण्यात येईल. तसेच अपेक्षित अध्ययन स्तरावर गाठणाऱ्या शाळा, शिक्षक, अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र मिळेल. ज्या शाळा, शिक्षक उद्दिष्ट साध्य करणार नाहीत, त्यांच्यावर लक्ष करण्यात येईल. हा उपक्रम ३० जून पर्यंत राबविण्यात येणार आहे. शिक्षकांनी मूल्यांकन घोषित करत असताना विद्यार्थ्यांच्या संपादित अध्ययन क्षमता बाबत कोणतीही चुकीची माहिती भरली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कृति कार्यक्रम स्वंयअर्थसहाय्यता व विना अनुदानित शाळा व तुकड्या व्यतिरिक्त सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.विद्यार्थ्यांना प्रथम भाषा व गणितासाठी कृती कार्यक्रमातर्गत ठरवून दिलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त कराव्या लागणार आहेत.

0 9 5 5 1 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *