बुलढाणा-जामठी-वरुड बसफेरी बंद असल्याने प्रवाशी त्रस्त

Khozmaster
1 Min Read

धाड:-विशेष प्रतिनिधी 

बुलढाणा आगारातून जामठी-वरुड– सोयगाव या भागात येणाऱ्या बसफेऱ्या मागील तीन वर्षापासून बंद करण्यात – आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह – नागरिकांना मोठा त्रास सहन करावा – लागत असल्याने प्रवाशी त्रस्त झाले – आहेत.बुलढाणा आगारातून या गावासाठी दिवसातून चारवेळा बससेवा सुरु होती. – मात्र, कोरोना महामारीपासून सदर – बसफेऱ्या अचानक बंद करण्यात – आल्या होत्या. सदर बसेस अद्यापही सुरु करण्यात आल्या नाहीत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. तसेच येथे आरोग्य सुविधा, कृषी केंद्र, बँक तसेच तहसिलच्या कामांसाठी बुलढाणा, धाड येथे जावे लागते.मात्र, बसेस बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांसह, विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्यामुळे मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे बुलढाणा आगार प्रमुखांचे दुर्लक्ष आहे. वरुड, सोयगाव, धाड, जामठी या गावात येणाऱ्या बसफेऱ्या पुर्वरत सुरु करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीचे ठराव बुलढाणा आगार प्रमुखांकडे देवून बस सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून बुलढाणा-जामठी-वरुड बसफेऱ्या सुरु करण्याची मागणी होत आहे.

0 9 5 5 1 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *