बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
मोताळा तालुक्यातील मोहेगाव शिवारातील वनविभागाच्या जवळपास ७५० एकर जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई ९ मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून करण्यात आली अाहे.या परिसरातील वनजमिनीवर अनेकांनी अतिक्रमण करून शेती करीत होते. या संदर्भात संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसेस देऊन जमिनीवरील हक्क सिद्ध करण्याचे वनविभागाने कळविले. परंतु, त्यांनी कोणतेही ठोस कागदपत्र सादर केले नाही म्हणून जिल्हा वनहक्क समितीने त्यांचे दाखल दावे रद्द केले आहे. मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत जवळपास ५०० जणांनी अतिक्रमण केलेली वनजमीनीचे पट्टे मिळावे म्हणून वनहक्क दावे दाखल केले होते. या दरम्यान वनविभागाने जमिनी बद्दल मालकीचे दावे सादर करण्याचे सांगितले, त्यांना अनेक वेळी नोटिसेस दिले. परंतु, अतिक्रमण धारकांनी कोणतेही पुरावे सादर केले नाही. त्यामुळे मोताळा तालुक्यातील मोहेगाव वनपरीक्षेत्रातील अतिक्रमित जमिनीवर जेसीबीच्या सहायाने चर खोदले जात आहे. पावसाळ्यात जमिनीत पाणी झिरपून पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. अतिक्रमण काढतांना तगडा बंदोबस्त असून मोहेगाव शिवारातील जवळपास ७५० एकर वनजमीन अतिक्रमण मुक्त करण्यात येत आहे. या नंतर मोताळा तालुक्यातील इतर ठिकाणचे अतिक्रमण काढला जाणार आहे. पावसाळ्यात पुन्हा कोणी अतिक्रमण करू नये यासाठी वन कर्मचारी तैनात राहणार आहे. तालुक्यातील जवळपास १ हजार ७५० एकर वन जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय डीएफओ सरोज गवस यांनी घेतला. त्यानुसार शुक्रवारला सकाळीच वनविभागाने राजूर घाटाच्या पायथ्याशी मोहेगाव शिवारातील अतिक्रमण हटविणे सुरू केले आहे. ११ वन अधिकारी, ४ पोलीस अधिकारी, ९५ वन कर्मचारी, ५० पोलीस कर्मचारी, सीआरपीएफची १ बटालियन, ३० वनमजुर असा कडेकोट बंदोबस्तात १० जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण हटविले जात आहे.
Users Today : 18