माळेगाव येथे हिंदुसूर्य महाराणा प्रताप जयंती दाताळा

Khozmaster
2 Min Read

मोताळा :- तालुका प्रतिनिधी

मोताळा तालुक्यातील जळगाव खान्देश व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या माळेगाव येथे ९ मे २०२५ रोजी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा माळेगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कडू लक्ष्मण हिवाळे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच निनाजी बढे व उपसरपंच नाना इंगळे यांच्या संयुक्त हस्ते हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कडू हिवाळे यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून उपस्थित सर्व नागरिकांना व विद्यार्थ्यांना
त्यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती विशद केली. शाळा मुख्याध्यापक आर. पी. सुरळकर, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, नीलेश भोबे, गावातील ज्येष्ठ नागरिक गुलाबसिंह राजपूत, चतुरसिंह राजपूत, नारायणसिंह राजपूत, तेजूसिंह राजपूत आदींनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना वाहिली. याप्रसंगी सरपंच निनाजी बडे, उपसरपंच नाना इंगळे, शाळा समिती उपाध्यक्ष नीलेश इंगळे, भूषण राजपूत, भूपेश भंगाळे, रोहन राजपूत, आदित्य पाटील, नामदेव घंगाळे, रोशन
पाटील, योगेश राजपूत, रोशन भोंबे, ज्ञानेश्वर राजपूत, प्रणव भंगाळे, संदीपसिंह राजपूत, कुणाल खर्चे, रणजीतसिंह राजपूत, सुरेंद्र सोनवणे, मुन्ना सोनवणे, कपिल हिवाळे, ओम पाटील, गणेशसिंग राजपूत, मयूर भोंबे, निखिलकुमार हिवाळे, अक्षय दांडगे, श्रीकृष्ण भंगाळे, जितेंद्र भोंबे, मुरलीधर भंगाळे, विजय भंगाळे इत्यादी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा समिती अध्यक्ष कडू हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन भंगाळे यांनी केले.

0 9 5 5 1 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *