पिंपळगाव राजा एसटी बस काळेगाव-भालेगाव मार्गे सुरू शिवसेना तालुका प्रमुख बघे यांच्या प्रयत्नांना यश

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव :- तालुका प्रतिनिधी

पिंपळगाव राजा एसटी बस रोहना मार्गे काळेगाव, भालेगाव, पिंपळगाव राजा बस सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची होणारी गैरसोय थांबली असून शिवसेना तालुका प्रमुख बघे यांच्या मागणीला देखील यश आले आहे. रस्ता नादुरुस्त असल्यामुळे बंद असलेली बस काळेगाव भालेगाव मार्गे सुरू करण्यात आली आहे. खामगाव पिंपळगाव राजा रस्त्याचे नियोजन शून्य काम सुरू असून त्याच कारणाने एसटी महामंडळाने बस बंद केली होती. सदर बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे व शिवसेना उपतालुका प्रमुख गोपाल भील यांनी डेपो मॅनेजर अकोट यांची भेट घेऊन निवेदन दिले होते व पर्यायी मार्ग काळेगाव भालेगाव मार्गे बस सुरू करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान या मागणीची दखल घेत ९ मे रोजी रोहना मार्गे काळेगाव, भालेगाव, पिंपळगाव राजा बस सुरू करण्यात आली. त्यानिमित्ताने बस स्थानक खामगाव येथे शिवसेना तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुख यांनी चालक वाहक यांचा सत्कार करून पहिली फेरी पाठवली. त्याच बस फेरीचे काळेगाव वासियांनी सुद्धा स्वागत केले. यावेळी अनिल मुंढे, अनंता वाकुडकार, ज्ञानेश्वर पाटील, साठे बुवा, रुतीक राणा, प्रतीक वाकुडकार, राजू गोडे उपस्थित होते बस फेरी सुरू झाल्याने विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांची होणारी गैरसोय टळली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *