मलकापूर :- तालुका प्रतिनिधी
शेतकऱ्याने क्लेम केल्यानंतर सर्वे झाल्याच्या पंधरा ते वीस दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत मिळणे बंधनकारक असल्याचा नियम आहे. असे असतांना विमा कंपनी नियमाला बगल देत असून शेतकऱ्यांनी क्लेम करून २-३ वर्ष लोटूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा केले नाही. त्यामुळे तत्काळ शेतकऱ्यांची विमा रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
मलकापूर नांदुरा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या विविध योजनांचे पैसे सरकार थांबवून स्वतः वापरत आहे. या सर्व धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासही नकार देत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर तिजोरी खाली केली जाते व नेते, मंत्री, आमदार यांची घर भरली जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ९ मे रोजी मलकापूर तहसील कार्यालयात ठिय्या दिला. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करण्यात येत असून कोणास जास्त तर कोणास कमी रक्कम देण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक मंडळाचे पर्जन्य मापक बंद आहे. बाजूच्या मंडळावरून बंद असलेल्या मंडळाला अंदाजे मदत केली जात आहे. ज्या मंडळाचे पर्जन्यमापक चालू आहे, त्या मंडळात हेक्टरी २५ हजार, ३० हजार असा पीक विमा येतो आणि त्याच मंडळावरून ज्या मंडळाचे पर्जन्यमापन बंद आहे, त्यांना हेक्टरी २ हजार, ३ हजार असा पीक विमा देण्यात येत असून हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे सांगत कंपनीच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना तत्काळ विमा रक्कम देण्यात यावी, अशी मागणी देखील स्वाभिमानी शेतकसंघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, नांदुरा तालुकाध्यक्ष
चरणसिंह राजपूत, युवक तालुकाध्यक्ष गोलू पाटील, नानाभाऊ इंगळे, सचिन राणे, हर्षल नारखेडे यांनी केली आहे. १० दिवसांत शेतकऱ्यांची रक्कम अदा न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात
Users Today : 18