अवैध रेती वाहतूक बंद करण्याची संरपंचाची मागणी

Khozmaster
2 Min Read

लोणार :- तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील विदर्भ-मराठवड्याच्या हद्दीवर असलेल्या धाड गावात सुरु मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतुक सुरु आहे. रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांच्या जिवितास धोका वाढला आहे. त्यामुळे सुरु असलेल्या अवैध रेती वाहतूकीला पायबंद घालावा, अशी मागणी धाड ग्रामपंचायत सरपंच विलास मोरे यांनी ग्रामपंचायत ठरावाव्दारे तहसीलदार भूषण पाटील व ठाणेदार निमिष मेहत्रे यांच्याकडे केली आहे.
लोणार तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, धाडमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरु आहे. त्यामुळे गावातील रस्त्यांवरुन रेती वाहतूक करणारे वाहने भरधाव वेगात धावतात. गावाला लागून ४ कि.मी. अंतरावरील मराठवाड्यातील बन व इतर ठिकाणावरून ही रेती वाहतूक सुरु आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर वर्दळ असून गावातील नागरिक घरासमोर रात्री झोपतात. तर दिवसा लहान चिमुकले आपल्या घराच्या अंगणात खेळतात. रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची संख्या वाढली असून चिमुकले व नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.

तहसीलदारांनी मंठा, शेणगाव येथील रेती माफियांना रान मोकळे करून दिल्याने अवैध रेती वाहतूकीस उधान आले आहे. माफियांनी जागोजागी रेती साठे करून धाड मार्गे लोणारकडे दिवसरात्र सदर रेतीची वाहतूक चालवली आहे. या रेती वाहतूकीने गेल्या वर्षभरात तालुक्यातील ६ निष्पाप नागरिकांचे बळी घेतले आहे. उपरोक्त रेती वाहतूकीला पायबंद न घातल्यास यावर्षी देखील बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर रेती वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी, अशी

0 9 5 5 1 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *