बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून अनेक जण अजितदादांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करत असतानाच, आता केंद्रात व राज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचा मित्र पक्ष असलेल्या रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षात प्रवेश होत असून, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे या गटाचे माजी जिल्हाध्यक्ष नरहरी गवई त्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथे बुधवार ७ मे रोजी प्रवेश घेतला आहे. त्यांच्या या प्रवेशाने रिपाई आठवले गटाला मोठा धक्का बसला असून, मागासवर्गीय नेतृत्व कार्यकर्त्यांची तर मोठी फळी अजित दादा गटात दाखल झाली आहे !याप्रसंगी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता मा. महेशजी शिंदे, जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, शंतनू बोन्द्रे, टी. डी. अंभोरे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पक्ष प्रवेश करणारे नरहरीदादा गवई यांनी यापुढची राजकीय वाटचाल अजितदादांच्या नेतृत्वात करणार असल्याचे सांगितले याप्रसंगी ना. मकरंद आबा पाटील, महेश शिंदे, नाझेर काझी यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी बाळासाहेब दामोदर, दिलीप वानखेडे, आम्रपाली वानखेडे, शुभम वानखडे नितीन कांबळे, भागवत साळवे, सुरेश खंडारे, किरण दामोदर, आकाश हिरोळे, दिपक जाधव, राहुल इंगळे, गजानन डोंगरदिवे, सागर जाधव, सिद्धोधन गवई, विकी कांबळे, अशोकराव वानखेडे, सुदर्शन निकाळजे, नितीन शेजूळ, उद्धवराव वानखडे, राजूशेठ इंगळे, रतनभाई वानखडे यांनी पक्षप्रवेश केला.
Users Today : 20