संग्रामपूर तालुक्यात जन्मदरात वाढत आहे अंतर

KHOZ MASTER
2 Min Read

सोनाळा:-विशेष प्रतिनिधी

सातपुडयाचा आदिवासी बहुल तालुका म्हणून संग्रामपूर तालुक्याची सर्वदूर ओळख आहे. दरडोई उत्पन्नात हा तालुका पिछाडीवर आहे. या तालुक्यात गत दोन वर्षात जन्मलेल्या अपत्यांमध्ये मुलींची संख्या कमी असून मुलांची संख्या अधिक आहे. हे वास्तव आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २५ पर्यंत संग्रामपूर तालुक्यात २०६२ मुलांचा जन्म झाला. केवळ १९४७ मुलींचा जन्म झाला आहे. वर्षे २३-२४ मध्ये ६३ मुली तर सन २४-२५ या वर्षात ५२ मुली मुलांच्या तुलनेत कमी जन्मल्या आहेत.’ बेटी बचाव ‘अभियान शुन्य पातळीवर म्हणजे तळागळात राबविण्यात येत आहे. तरी मुलींच्या जन्म दरात घटच आल्याने बेटी बचाव अभियानाला मोठा धक्का बसला आहे. परिणामी मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे. यासाठी सुरु असलेल्या विविध उपाय योजना योजनांचा नव्याने आढावा घेण्याची वेळ आली आहे. संग्रामपूर तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रातर्गत जन्मलेल्या अपत्यांची माहिती समोर आली आहे. सन २३ – २४ मध्ये पळशी झाशी केंद्रातर्गत मुले २२३ तर १९२ मुलींचा जन्म झाला. येथे २३ मुली कमी जन्माला आल्या. सोनाळा येथे ३५८ तर मुली ३७४ जन्म येथे अपवाद असून १६ मुलींचा जन्म झाला. वानखेड केंद्रात मुले २४३ तर मुली २१७ जन्म तर २६ मुली कमी पातुर्डा केंद्रात १९५ मुले तर मुली १७३ जन्म. येथे २२ मुलींचा जन्म अंतर आहे. एकंदर उपरोक्त वर्षात. एकूण ६३ मुलींचा जन्म कमी झाला आहे. सन २४-२५ यावर्षात पळशी झाशी केंद्रात २३४ मुले तर मुली २२० जन्म. येथे १४ मुली कमी जन्मल्या. सोनाळा मध्ये ३८० मुलेतर मुली ३६५ जन्म येथे १५ मुली कमी. वानखेड मध्ये २०४ मुले तर १९८ मुली जन्म. येथे ६ मुली कमी. पातुर्डा येथे २२५ मुले तर मुली २०८ जन्म. येथे १७ मुली कमी. या वर्षात मुलांच्या तुलनेत ५२ मुली कमी जन्माला आल्या आहेत. हे अंतर कमी असले तरी मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध योजना स्थानिक पातळीवर वाढविण्यासाठी एकात्मीक प्रकल्प मधून लक्ष देण्याची गरज आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *