गारपीटीमुळे शेतकऱ्याच्या सौरऊर्जा पॅनेलचे नुकसान

Khozmaster
1 Min Read

किनगावराजा:-विशेष प्रतिनिधी

येथून जवळच असलेल्या पळसखेड चक्का येथील शेतकऱ्याच्या सौरऊर्जा पॅनलचे गारपीट तसेच वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फुटून नुकसान झाल्याची घटना घडली आहे.बाबूलाल रामभाऊ खजुरे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून पळसखेड चक्का येथील गट क्रमांक १९५ मध्ये त्यांचे सौरपंपाकरीता बसवलेले सौरऊर्जा पॅनल होते. परंतु ६ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान सोसाट्याचा वारा तसेच गारीसह झालेल्या पावसामुळे त्यांनी बसविलेले सौरऊर्जा पॅनेल फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर शेतकऱ्याची सद्यपरिस्थिती झालेले आर्थिक नुकसान सहनकरण्याजोगी नसल्याने सोलर कंपनीने शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी बाबूलाल खजुरे यांनी केली आहे.

0 9 5 5 1 8
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *