चांडोळ:-विशेष प्रतिनिधी
ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातील नाल्या ओव्हरफ्लो झाल्या असून सदर नाल्यांचे घाण पाणी मुख्य रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.चांडोळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडूंब भरलेल्या आहेत. त्यामुळे सदर नाल्यांव्दारे वाहनारे सांडपाणी आता मुख्य रस्त्यांवरुन वाहत आहे. सोबतच पाणी पुरवठा करण्यासाठी गावातून करण्यात आलेल्या पाईपलाईनवर बसविण्यात आलेल्या व्हॉल्वमध्ये सदर पाणी घुसत असून नळाला येणारे पाणी दुर्गंधीयुक्त येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेत ग्रामपंचायत प्रशासनाने नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. बहिऱ्या शासनाला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांचा गगनभेदी आवाज करू असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल राऊत, सचिन शिंगोटे, गजानन भोपळे, हर्षल मोरे, अमोल मोरे, आकाश माळोदे, नीलेश गवळी, उमेश राजपूत, बंडू देशमुख, परमेश्वर मोरे, निखील पाटील, रामा गावंडे, प्रतिक पाटील, धनराज पाटील, कुशल सोनवणे, महादेव मोरे, सारंग झांबरे, पवन चोपडे, अविनाश वाघोदे, संदीप कुंबेथोप, उमेश सपकाळ, नरेश इंगळे, समाधान कुयटे, राहुल पाटील, गणेश दीक्षित, विठ्ठल गायकवाड, गणेश गायकवाड. यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारचे शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष पाळणे व आजही अनेक शेतकरी सरकारने कर्जमुक्तीचे पिकविम्यापासून वंचित आहे. त्यांना हक्काचा पिकविमा मिळाला पाहिजे. सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाच्या बुडाखाली आग लावण्यासाठी, कर्जमुक्ती, पिकविम्याच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.
