मोताळा:- तालुका प्रतिनिधी
मागील बारा वर्षापासून दिव्यांग, वृद्ध निराधार, विधवा महिला, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष राजेश पुरी यांना शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मोताळा तालुक्यातील दिव्यांग राजेश पुरी अतिशय चाणाक्ष असून दिव्यांगासाठी नेहमी झटत असतात. कोणाची कुठलीही अडचण असो ते नेहमीसाठी प्रत्येकाला मदत करतात. त्यांनी दिव्यांगासाठी विशेष कार्यालय सुरू केले आहे. दिव्यांग असलेले राजेश पुरी यांनी मागील बारा वर्षापासून दिव्यांग, वृद्ध निराधार, विधवा महिला, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करीत त्यांना न्याय देण्याचा केला. दिव्यांग मिळवून प्रयत्न स्वतः असूनही राजेश पुरी यांनी दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायतमध्ये स्वतःला कोंडून घेत आंदोलन केले होते.जि. प. इमारतीला काळे फासो आंदोलन, घरकुल निधीसाठी उपोषण, दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी भीक मांगो आंदोलन, दिंडी आंदोलन तसेच मुंबई व बुलडाणा येथील जेल भरो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचा बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विस्तार केला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलक पुरस्काराने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते अकोला येथे सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
